देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3.0 सुरु झाल्यानंतर कंन्टेंमेंट झोन वगळता इतर भागात काही दुकानं अर्टी-शर्तींसह सुरु करण्याती परवानगी देण्यात आली आहे. मात्र देशातील, राज्यातील सर्व सीमा बंद आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक लोक मुंबईत अडकले आहेत. भटक्या नंदीबैलवाल्या समाजाची 10 कुटुंबही त्यांच्या लहान मुलांसह लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भटक्या नंदीबैलवाले समाजातील अडकलेल्या 10 कुटुंबांसोबत त्यांच्या 16 गायी आणि नंदीबैल आहेत. तीन ते साडे तीन महिन्यांपूर्वी ही कुटुंब मुंबईत आली. भिक्षा मागणं आणि त्यानंतर पुन्हा आपल्या गावी परत जाणं हे पिढ्यांपिंढ्या सुरु आहे. अनेक पिढ्या ते मुंबईत येतात. सध्या वांद्र्यातील खैरवाडी इथल्या एका मैदानात या कुटुंबांनी मुक्काम केला आहे.


मात्र,  लॉकडाऊनमुळे त्यांच्या खाण्याची मोठी गैरसोय होत आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या जनावरांच्या खाण्याचीही मोठी अडचण निर्माण झाली असून त्यांचेही हाल होत आहेत.


पुण्यातील दौड तालुक्यातील चौफुला खेडगाव येथे राहणारी ही नंदीवाला समाजाची कुटुंब आहेत. मात्र लॉकडाऊन असल्याने ही कुटुंब मुंबईतच अडकली असून, त्यांच्या गावचे लोकही त्यांना आता कोरोना संपल्यावरच या असं सांगतात.


दरम्यान, मुंबईत परराज्यातीलही अनेक मजूर अडकले आहेत. हाताला काम नसल्याने त्यांच्याकडे पैसे नाहीत. पैसे नसल्याने या सर्व सर्व मजूरांनी आपापल्या गावी जाण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे कोणतंही साधन उपलब्ध नसल्याने हे मजूर पायीच अनेक किलोमीटरचं अंतर कापत आहेत. आता सरकारकडून प्रवासी मजूरांना त्यांच्या गावी पोहचण्यासाठी काही ट्रेनची सुविधा सुरु करण्यात येत आहे. 


औरंगाबादमध्ये रुळांवर झोपलेल्या मजुरांना मालगाडीने चिरडले; १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू