Disha Salian Death Case : सालियन मृत्यू प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशान ( Maharashtra Winter Session 2022 ) चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  केला आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा खळबळजनक दावा देखील नितेश राणेंनी केला. नितेश राणे यांच्या आरोपांमुळे Disha Salian प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असतानाच आता नारायण राणे सांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाला डिवचले आहे. शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही असा हल्लाबोल नारायण यांनी केला आहे.


शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही असे का म्हणाले नारायण राणे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री (Lady CM) विराजनमान करण्याचे मोठे संकेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले होते. आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे. मुख्यमंत्रीपदी आपली व्यक्ती असेल. महिला असो किंवा पुरुष… असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यांनतर 17 डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना ठाकरे गटातर्फे महिला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून लाँच केले होते. यावरुनच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मोर्चाच्या दिवशी उद्धव ठाकरे हे छाताडावर नाचू असू म्हटले होते. मात्र, या मोर्चाला अजिबात गर्दी दिसली नाही असा टोला देखील नारायण राणे यांनी लगावला. 


शिवसेनेत पुरुष शिल्लक नाही म्हणूनच महिलेला मुख्यमंत्री करणार असं त्यांनी सांगितलं असल्याचं म्हणत नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  दिशा सालियान आणि सुशांत राजपूत यांची हत्या आहे.  ही माझी ठाम भूमिका आहे. या दोघांची आत्महत्या नसून ही हत्याच आहे असा पुर्नोच्चार नारायण राणेंनी केला. सुशांत सिंह यांची हत्या होताना आणि दिशा सालियान वर अत्याचार होताना काही लोकांनी पाहिलं आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. 


सुशांत सालियान आणि दिशा शालियान च्या हत्येमध्ये आदित्य ठाकरे आरोपी आहेत असा दावा नारायण राणे यांनी केला. आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. सगळ्या बाजूनं याची चौकशी होईल. आवाज देखील तपासला जाईल. फक्त मोबाईल सापडला पाहिजे.  302 लागल्यानंतर ठाकरे आणि मातोश्रीत राहतो म्हणून नवीन कायदा आहे का तपासून पाहावं लागेल असही नारायण राणे म्हणाले.