मुंबई : महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विधान भवनामध्ये या दोघांची भेट झाली. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नारायण राणेंना राज्यसभेच्या उमेदवारीची ऑफर दिली होती. याबाबतचा निर्णय नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना कळवला आहे. मुख्यमंत्री याबाबत उद्या अमित शहांबरोबर चर्चा करणार आहेत. चर्चा झाल्यावर दोन दिवसांनी निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान सगळं व्यवस्थित घडेल, वाट पाहावी, अशी सूचक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी राणेंसोबतच्या बैठकीनंतर दिली आहे.


भाजपनं राणेंना ही ऑफर दिली असली तरी त्यांनी राज्याच्या राजकारणातच सक्रीय राहावे, अशी इच्छा राणेंचे समर्थक आणि नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांनी व्यक्त केली होती. नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये शहांनी राणेंना राज्यसभेच्या जागेसाठी विचारणा केली होती.