मुंबई : आता फक्त तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार याबाबत महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणेंच्या भाजप प्रवेश मुहूर्ताच्या विविध तारखा जाहीर होत आहेत, मात्र खुद्द नारायण राणे, त्यांचे कुटुंबीय वा निकटवर्तीय त्यावर अधिकृतपणे काहीही भाष्य करणं टाळत आहेत. तरीही राणे समर्थकांनी आतापासूनच वातावरण निर्मिती सुरु केलीय.  


'आमचा पक्ष राणेसाहेब'  या घोषवाक्याच्या जाहिराती आता सोशल नेटवर्किंग माध्यमांवर पसरवल्या जात आहेत. राणे समर्थक जोरदार शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहेत.