मुंबई: ग्रँड हयातमध्ये पार पडलेल्या महाविकासआघाडीच्या कार्यक्रमाला १६२ नव्हे तर फक्त १३७ आमदारच उपस्थित होते, असा खळबळजनक दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला. एवढेच नव्हे तर या १३७ आमदारांमध्येही विधान परिषदेच्या अनेक आमदारांचा भरणा होता, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या बहुमताच्या दाव्याविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनीही पत्रकापरिषद घेऊन महाविकासआघाडीच्या आमदारांच्या ओळख परेडवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी केलेली आमदारांची ही परेड हा राज्यपालांवरील दबावतंत्राचा एक भाग असल्याची चर्चा आहे. मात्र, याठिकाणी १६२ आमदार आहेत, हा केवळ कांगावा होता. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने आत्मपरीक्षण केले तर त्याठिकाणी १४५ आमदार होते का, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, असा टोलाही शेलार यांनी लगावला. 


'तुमची आमदारकी जाणार नाही, ही माझी जबाबदारी'


महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार पहिल्यांदाच एखाद्या मंचावर एकत्र आले होते. यावेळी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केले. तसेच या आमदारांना कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदत करणार नाही, महाविकासआघाडीसोबत कायम राहू, अशी एकजुटीची शपथही देण्यात आली. 


राष्ट्रवादीकडून १५ 'संशयित' आमदारांची वेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था