Narayan Rane : `संजय दत्त बॅग घेऊन आला अन् मातोश्रीवर...`, खळबळजनक आरोप करत नारायण राणेंनी सांगितला `तो` किस्सा!
Maharatra Politics : सहारा हॉटेलमधून 140 मराठी कामगारांना काढण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दगडफेक करायला लावली. एका कामगारामागे 4 लाखांप्रमाणे 7 कोटी रूपये घेतले असा गंभीर आरोप नारायण राणेंनी (Narayan Rane On Uddhav Thackeray ) केलाय.
Narayan Rane On Uddhav Thackeray : शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचा 'शिवसेना लोकाधिकार आणि मी' या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होतो. मुंबईतल्या सहारा हॉटेल (Sahara Hotel) येथे हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) देखील उपस्थित होते. नारायण राणे यांनी या प्रकाशन सोहळा कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंना घरचा आहेर दिला आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर तोफ टाकली. सहारा हॉटेलमधून 140 मराठी कामगारांना काढण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दगडफेक करायला लावली आणि बदल्यात तडजोड करत एका कामगारामागे 4 लाखांप्रमाणे 7 कोटी रूपये घेतले असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केलाय. इतकंच नाही तर एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याकाठी 25 लाख रूपये द्यायचा असा आरोपही राणेंनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी लावा मी उत्तर द्यायला तयार आहे, असंही राणेंनी म्हंटलंय. नारायण राणेंच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
माझी हाईट कमी होती अन् माझं वय पण तेव्हा 15 वर्ष होतं. त्यामुळे दुसऱ्या एका मुलाला मी दोन दुसरे देऊन नारायण राणे नाव नोंदवायला सांगितलं. मी 18 वय क्रॉस केल्यानंतर मला आयकर विभागात नोकरी मिळाली. शिवसेना जन्माला आली तेव्हा उद्धव ठाकरे 8 वर्षांचे होते. तेव्हा रुमाल पण सोबत नव्हता, असं म्हणत राणेंनी हशा पिकवला. कोरोना काळात औषधांवर 15 टक्के कमिशन कोणी घेतलं? असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी केला. तर त्यावेळी त्यांनी संजय दत्तचा देखील उल्लेख केला.
संजय दत्त देखील मातोश्रीवर बॅग घेऊन आला होता. ते पण बॅग ओढत घेऊन आला होता. तो आला कसा? गेटपासून बॅग ओढत ओढत घेऊन गेला ना? कोणत्या गेट मधून आला ते पण मी सांगू का? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. त्यावेळी त्यांनी जालन्यात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर देखील मत मांडलं. जालन्यामध्ये जे झालं त्यात लक्ष द्या. मराठा समाज 34 टक्के आहे, कोणत्याही जातीचा अंत पाहू नका, असं म्हणत नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांना घरचा आहेर दिला आहे.