मुंबई : नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही यावर अनेक चर्चा होत होत्या. मात्र, आता यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिवसेनेच्या विरोधाला फारसं महत्व न देता मुख्यमंत्र्यांनी राणेंचे मंत्रिमंडळातील स्थान निश्चित असल्याचं सांगितलं. पाहुयात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले...



तर तिकडे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केलीय. नारायण राणे ईडीच्या चौकशीतून वाचता यावं यासाठी भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलाय.


स्वार्थासाठी राणेंनी काँग्रेस सोडली, आता त्यांची परिस्थिती ना घर का ना घाट का अशी झाल्याचंही राऊतांनी म्हटलंय.


शिवाय नारायण राणेंना भाजप मंत्रिमंडळात घेणार नाही असा विश्वासही विनायक राऊतांनी व्यक्त केला. तळ कोकणात राणे आणि राऊत एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. राणेंनी काँग्रेस सोडून भाजपची साथ धरल्यापासून शिवसेनेनं त्यांच्यावर टीकेची झोड उठवलीय.