मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करताना बुलेट ट्रेनचं समर्थन केलं. मात्र, याच बुलेट ट्रेनवरुन राणेंनी काँग्रेसमध्ये असताना जोरदार टीका केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांनी बुलेट ट्रेनवर भाष्य करताना म्हटलं होतं की, मोदींनी अहमदाबादऐवजी विदर्भात बुलेट ट्रेन सुरू करायला हवी होती. तसंच जपानच्या कंपनीपेक्षा देशी कंपनीला बुलेट ट्रेनचं कंत्राट द्यायला हवं होतं असंही राणेंनी नमूद केलं होतं.


तर, आता काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणेंनी मोदींच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला समर्थन दिलं आहे. जी बुलेट ट्रेन ५० वर्षानंतर दिसणार होती, ती दोन-चार वर्षात दिसणार असेल तर बुलेट ट्रेन का नको? असा प्रश्न विचारत नारायण राणे यांनी बुलेट ट्रेनचं समर्थन केलं.


इतकेच नाही तर, नारायण राणेंनी म्हटलं की, माझा विकासाला विरोध नाहीये. जरी कर्ज काढून बुलेट ट्रेन मिळत असेल तर माझा पाठिंबा आहे.