मुंबई : इस्रायलमध्ये भारताबाहेरची सर्वाधिक मराठी बोलणारी जनता राहते. त्यामुळे इस्रायल आणि महाराष्ट्राचं एक वेगळे नातं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याने महाराष्ट्राचा मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती इस्त्रायल परराष्ट्र दूत डेव्हिड अकाव यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रला इस्रायलकडून कृषी क्षेत्रात मोठी मदत होऊ शकते. मोदींच्या दौऱ्यावर शेती आणि जलव्यवस्थापन यावर सर्वात जास्त भर असेल, असे ते म्हणालेत. शेती क्षेत्रात ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही. हे तंत्रज्ञान इस्रायली आहे. येत्या काही वर्षात मोशाव मॉडेल भारतात आणण्याचा प्रयत्न आहे. २०१५ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या इस्रायल दौऱ्यात त्या विषयीची मूहुर्तमेढ रोवण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.


काय आहे मोशाव मॉडेल?


१. सहकारी शेतीचं मॉडेल
२. बियाणे खरेदीपासून तर आलेलं पिक बाजारात जाईपर्यंत सगळं सहकार्यातून केलं
३. पाणी, यंत्रसामग्री असं सारं काही शेअर केलं जातं.


यवतमाळ जिल्ह्यात हा प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प वेग घेत आहे. 'आधार'च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्यातही इस्रायलची मदत होणार आहे. इस्रायलनं महाराष्ट्रात ४ शेती संशोधन केंद्र सुरु केली आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात स्मार्ट सिटी योजना अंमलात आणतानाही इस्रायली तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. ठाण्यात हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. मोदींच्या दौऱ्यानं या सर्व प्रकल्पाना बळकटी मिळणार आहे, असे ते म्हणालेत.