मुंबईच्या ट्रेनमध्ये तरुणाला बेदम मारहाण, स्टेशनवर उतरण्यापासून रोखलं
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल लोकल मध्ये एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल लोकल मध्ये एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या तरुणाला बेलापूर स्टेशनवर उतरायचे होते, मात्र बेलापूर स्टेशन आल्यानंतर, या इतर तीन प्रवाशांनी त्याला उतरण्यासाठी जागा दिली नाही. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर या तीघांनी तरुणाला बेदम मारहाण केली.
मारहाणीनंतर इतर लोकांनी मारहाण करणार्या तीन तरुणांना खारघर रेल्वे स्टेशन वरती उतरून पोलिसांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी पनवेल रेल्व पोलीस पुढील कारवाई करत आहेत.