मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) रहात असलेल्या खार निवासस्थानी हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. राणा दाम्पत्याविरोधात खार पोलिसात (Khar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर खार पोलीस राणा यांच्या घरी दाखल झाले. यावेळी राणा दाम्पत्य आणि पोलिसांमध्ये  बाचाबाची झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना आधी वॉरंट दाखवावं असं सांगत राणा दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घातली. आम्हाला जबरदस्तीने नेण्याचं काम सुरु अससल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. पाचशे लोकांनी आमच्या घरावर हल्ला केला, संजय राऊत म्हणतात आमच्या गोवऱ्या स्मशानात रचू, 20 फूट खाली गाडू त्या संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, अनिल परब यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी रवी राणा यांनी केली. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुम्ही अशा आमच्या घरात येऊ शकत नाही, चला बाहेर, अशा शब्दांत नवनीत राणा यांनी पोलिसांना सुनावलं. 


पण वॉरंट दाखवण्याची मागणी करणाऱ्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी इमारतीखाली आणलं. दुसरीकडे घराबाहेर मोठ्याप्रमाणावर शिवसैनिक जमा होते त्यांना राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलीस सुरक्षेत राणा दाम्पत्याला पोलीस घेऊन गेले.