अर्णव गोस्वामींची अटक म्हणजे लोकशाहीची हत्या - नवनीत राणांची टिका
सरकार विरोधात बोलणार त्याला अशाच प्रकारे तुरुंगात डांबणार का?
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: रिपब्लिकन भारत चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक म्हणजे लोकशाहीची हत्या होय अशी टिका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच जो कोणी ठाकरे सरकार विरोधात बोलणार त्याला अशाच प्रकारे तुरुंगात डांबणार का? असा सवालही अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरनी आज रिपब्लिक भारत टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलिसांनी सकाळी त्यांच्या घरून अटक केली आहे. यावरून आता ठाकरे सरकार व पोलिसांवर टीका होऊ लागली आहे.
आज सकाळी पोलिसांनी ज्या प्रकारे अर्णब गोस्वामी यांना अटक केली ते चुकीचं आहे. ते मोठे गुन्हेगार, टेरेरिस, कुणाची हत्या केली नाही, चोर नाही आहे. ज्या पद्धतीने त्यांना अटक केली ते योग्य नाही. सकाळी त्यांच्या घरी जाऊन अटक करणे पोलीस व्हॅन मधून टाकून घेऊन जाणे हे लोकशाहिची हत्या आहे असंही खासदार नवनित राणा म्हणाल्या.
राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले महाराष्ट्र सरकार अस करत नाही. परंतु आम्ही पाहतो मी महाराष्ट्र मध्ये जन्मले महाराष्ट्राच्या मातीत वाढले महाराष्ट्रात राजकारण करत आहे. आतापर्यंत अनेक सरकार आले पण कधी असं कुठल्या प्रकारच काम झालं नाही. परंतु आता कुणी ठाकरे सरकार वर बोललं की लगेच त्यांना अशी वागणूक देणार का असा सवालही खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला केला आहे.