मुंबई : नेव्ही डेच्या निमित्ताने, द गेटवे ऑफ इंडिया जवळ बिटींग द रिट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवानांनी प्रात्यक्षिके सादर केली.


४ डिसेंबरला साजरा होतो नेव्ही डे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक वर्षी ४ डिसेंबरला नेव्ही डे साजरा होण्याआधी जवान गेटवेसमोर 'बिटिंग द रिट्रीट' आयोजित करतात. हा सोहळा पाहण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. काही दिवसांपूर्वीच जवानांनी याचा अभ्यास केला होता तेव्हा देखील अनेक लोकं हे पाहण्यासाठी जमा होत होते.


पाकिस्तानचा पराभव


१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या विजयाचा दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नेव्ही डे साजरा केला जातो. त्या युद्धात भारतीय नौदलाने मिसाईल नौकेवरुन कराची बंदरांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाकिस्तानातील चारही युद्ध नौका बुडाल्या होत्या. सोबतच बंदरावरील इंधन देखील उद्ध्वस्त केलं होतं. यामध्ये नंतर ५०० हून अधिक पाकिस्तानी जवान मारले गेले होते.


या युद्धात भारताच्या आयएनएस निर्घात, आयएनएस निपट आणि आयएनएस वीर यांनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.