मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यानंतर आता त्यांची बहिण यास्मिन वानखेडे हिला टार्गेट केलं आहे. नवाब मलिक यांनी ड्रग पेडलर आणि समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांच्या व्हॉटसअॅप चॅटचा स्क्रीनशॉट ट्विट केला आहे. दोघांमध्ये व्हॉटसअप चॅट झाल्याचा मलिकांनी दावा केला आहे.



तर यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. आमचा दिवाळीचा सण नवाब मलिक यांनी खराब केला, आमचा कुठल्याही ड्रग पेडल्सर किंवा व्यक्तीशी संबंध नाही, मी वकील आहे त्या संबंधीचे एखाद्या केस बद्दलचे whatsp चॅट मध्ये छेडछाड करून ते दाखवत आहेत, असं स्पष्टीकरण यास्मिन वानखेडे यांनी दिलं आहे.