मुंबई : गेल्या वर्षी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात गौप्यस्फोट करणारे एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे.  हृदयविकाराच्या झटक्याने निधन प्रभाकर साईल यांचं निधन झाल्याची माहिती वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी प्रभाकर साईल यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी 11 वाजता प्रभाकर साईल यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल.



कोण आहेत प्रभाकर साईल
प्रभाकर साईल किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. एवढंच नाही तर त्यांनी अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले होते. 


त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव देखील घेतली होती. ज्या क्रूझमधून ड्रग्स हस्तगत करण्यात आले होते, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, आसा दावा देखील प्रभाकर साईल यांनी केला.