मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी कोविड-१९ (COVID-19)  लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले. आज सकाळी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेतला असे ट्वीट शरद पवार यांनी केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. तात्याराव लहाने (Dr.Tatyarao Lahane) आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार असेही ते ट्वीटमध्ये पुढे म्हणाले. 


योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.



नुकतीच शरद पवार यांच्यावर ब्रीचकॅण्डी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.



3 एप्रिल रोजी त्यांना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. पवारांना पोटदुखीचा त्रास वाढल्यानं त्यांच्यावर मुंबईतील तातडीनं शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यांच्या पित्ताशयात झालेले खडे शस्त्रक्रियेमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले.