NCP Party and Symbol Row in Maharashtra: आगामी राज्यसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक पाहाता राज्यात पुन्हा एकदा दोन्ह गटामध्ये अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घडाळ हे चिन्ह अजित पवारांकडे देण्यात आलं. शरद पवारांसाठी हा सर्वोच्च धक्का मानला जातो आहे. अजित पवारांनी बंड करुन शिंदे फडणवीस सरकारसोबत हात मिळवणी केली. तेवढंच नाही तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून उपमुख्यमंत्री पदी अजित पवार विराजमान झाले. काका पुतण्याची ही लढाई महाराष्ट्रातील राजकारणात तशी नवी नाही. पण यंदा पवार कुटुंबातील सत्तेसाठीची ही लढाई कोर्टापर्यंत पोहोचली आहे. (NCP headquarters in Mumbai to Ajit Pawar group Both groups struggle for survival Loksabha election)


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय अजित पवारांकडे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गट मुंबईतल्या बेलार्ड इस्टेटमधलं राष्ट्रवादीचं मुख्यालयही ताब्यात घेणार का याकडे लक्ष लागलंय. नियमानुसार राष्ट्रवादी अधिकृत पक्ष अजित पवार गटाकडे आल्यानं मुख्यालयही दादांकडे येणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचं मुख्यालय हे वेल्फेअर ट्रस्टचं नसून पक्षाच्या मालकीचं असल्यानं ते अजित पवार गट ताब्यात घेईल अशी शक्यता वर्तवली जातेय. काही दिवसांनंतर यासंदर्भात अजित पवार गटाकडून हालचाली सुरु होतील असं सूत्रांकडून समजतंय. 


'चिन्ह आमचं, बाप आमचा!'


मुंबईच्या बेलार्ड इस्टेट इथल्या राष्ट्रवादी मुख्यालयाच्या बाहेर शरद पवार यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावण्यात आलीयेत. चिन्ह आमचं, बाप आमचा असा मजकूर लिहिलेली पोस्टर्स शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लावलीयेत. एकीकडे बेलार्ड इस्टेटचं राष्ट्रवादी मुख्यालय अजित पवार गट ताब्यात घेणार का याकडे लक्ष लागलेलं असतानाच शरद पवार गटानं राष्ट्रवादी मुख्यालयाबाहेर पोस्टरबाजी केलीय.. 


दिल्लीतील कार्यालयाबाहेर पोस्टरबाजी!


निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांच्या समर्थनार्थ दिल्लीत त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोस्टर लावण्यात आलेत. तरुणाई शरद पवारांसोबत असल्याचा संदेश त्यावर लिहिण्यात आलाय.