राष्ट्रवादी नेते धनंजन मुंडे माघारी, पक्षाच्या अधिकृत बैठकीला उपस्थित
अजित पवारांसोबत १३ आमदार होते. त्यातील आता सात आमदार माघारी परतले. तर आता राष्ट्रवादीच्या बैठकीला अजित पवारांसोबत असलेले धनंजन मुंडे उपस्थित आहेत.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ५४ आमदारांच्या सहीचे पत्र रात्री १२.३० वाजण्याचा दरम्यान राज्यपालांना दिले. त्यानंतर सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी अजित पवारांसोबत १३ आमदार होते. त्यातील आता सात आमदार माघारी परतले. तर आता राष्ट्रवादीच्या बैठकीला अजित पवारांसोबत असलेले धनंजन मुंडे उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी नेते धनंजन मुंडे यांचे यशवंतरा चव्हाण सेंटरमध्ये आगमन झाले आहेत. दरम्यान, अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ गेले होते. त्यांनी तासभर चर्चा करुन माघारी आले आहे. दरम्यान, पुणे शहरातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दोन्हीही आमदारांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार परतले होते.