मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नवनवे आरोप आणि खुलासे करण्याची मालिकाच सुरु केली आहे. दररोज नवनवे ट्विट करत मलिक नवाब मलिक एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे आणि एनसीबीवर आरोप करत आहेत. यातच आज त्यांनी आणखी एक ट्विट करत सूचक इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाब मलिक यांनी ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी सूचक इशाराही दिला आहे. मलिक यांनी 'द ललित' हॉटेलचा उल्लेख करून केलेल्या नव्या ट्वीटमुळं ड्रग्ज प्रकरणातील सस्पेन्स कमालीचा वाढलाय. हॉटेल 'द ललित'मध्ये अनेक गुपितं दडल्याचा दावा करून रविवारी भेटूया असं मलिकांनी ट्विटमध्ये म्हटलंय. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर मलिक काय गौप्यस्फोट करणार याचीच सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. पण, द ललित मधील गुपितांचा संबंध कुणाचा याची चर्चा आता होऊ लागली आहे.



त्याआधी नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंआहे. “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे”



दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटवर भाजपचे मोहित भारतीय यांनी रिट्विट करत प्रतिउत्तर दिलं आहे. अब बात निकलेगी तो फिर दूर तलकही जायेगी, अब डरो मत भागो मत, तुम्हारे हर पाप का सवाल पूछा जाए गा! असं ट्विट करत मोहित भारतीय यांनीही इशारा दिला आहे.



आता दिवाळीनंतर हे ट्विटर वॉर कोणतं वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.