राष्ट्रवादीचे नेते मलिक यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकावले?
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दाखल केलेल्या मानहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दोंडाई पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना धमकावल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.
मुंबई : पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दाखल केलेल्या मानहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दोंडाई पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना धमकावल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.
पोलीस स्टेशन डायरीत नोंद
याप्रकरणी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोलीस स्टेशन डायरीत याची नोंद केली आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे मानसिक तणावात असल्यामुळे बदलीची मागणी केलीय.
काँग्रेस नेत्यांकडूनही दबाव
मलिक यांनी फोनवरून धमकवल्याचा आरोप पोलीस नोंदीत आहे. तर काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख हे देखील वारंवार दबाव आणत सरकारी कामात अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे आपली बदली करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी वरिष्ठांकडे पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप होत असल्याने पोलिसांत भिती पसरल्याची चर्चा आहे.