मुंबई : राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहेत. 


संजय राऊतांच्या भेटीगाठी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली होती. संजय राऊत यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटले. या भेटीनंतर लगेचच संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली संजय राऊत हे दोन दिवसात सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटत आहेत.


अनिल देशमुख यांनी मागितली मुदत


100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आहेत. अनिल देशमुख यांनी इडीकडे उपस्थित राहण्यासाठी 7 दिवसांची मुदत मागितली आहे. आम्ही कायद्यानुसार पुढे जातोय तसेच तुम्हाला काय कागदपत्र हवी आहेत ती आम्ही देणार आहोत असं अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सांगिलतं आहे. देशमुखांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांनी काही सवलती मागितल्याचं वकिलांनी सांगितलं आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीने  अटक केली आहे.