मुंबई : सत्ता येत जात राहते नाती कायम राहतात हे सुप्रिया सुळेंचं वाक्य खूप काही सांगून गेलं. भावा बहिणीचं नातं सगळ्यांसाठीच महत्त्वाचं पण या भावाबहिणीचं नातं विशेष कारण या नात्यातल्या प्रत्येक हालचालीवर कोट्यवधी नजरा खिळल्यायत. रुसवे फुगवे दुर झाले, संणांना एकत्र येणं होईल पण अजित दादा परत जाईल का ही भीती मात्र कायम राहील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा सूर्यच उगवला तो ठाकरे आणि पवार ही दोन आडनावं महराष्ट्राच्या राजकारणात किती महत्त्वाची आहेच हे अधोरेखित करण्यासाठी...एरवी संसद प्रागणात दिसणाऱ्या सुप्रिया सुळे सक्काळी सक्काळी विधानभवनात दिसल्या. नेहमीच स्मित हास्य चेहऱ्यावर, पण डोळ्यात एका कडेला दिसत होता भावासाठीचा हळवेपणा, राजकारणानं ४ दिवस भाऊ दुरावला ते दु:ख सुप्रियाच्या चेहऱ्यावर दिसलं. प्रतिक्रिया देताना ४ दिवसापूर्वीच्या सुप्रिया आज खुलल्या. 



शपथविधीसाठी येणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना मिठी मारणाऱ्या सुप्रियांची, अजित पवार आले त्यावेळी थोडी चलबिचल झालीच असणार... भावा बहिणीनं एकमेकांना मिठीत घेतलं पण मनातला एक कोपरा दुखराच राहिला. मिठीत घेताना चेहरे मात्र विरुद्ध दिशेला दिसले. कालांतरानं जखमेचा प्रभाव कमी होईल कदाचित पण, ऐंशीव्या वर्षी बाबांना दादानं दुखावलं ही सल कायम राहील, येवढं मात्र नक्की.