मुंबई : विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरेंवर ठाण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, गणेश नाईक यांनी डावखरे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय नेतेमंडळींनी डावखरे यांना आदरांजली वाहिली. गुरुवारी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डावखरे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. डावखरे यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यातील राजकारणातला एक वजदार नेत काळाच्या पडद्याआड गेलाय.


डावखरे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी राजकारणात अजातशत्रू अशी त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांशीही त्यांचा स्नेह होता.. शिवसेनेचे ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती.