मुंबई : NCP Meeting in Mumbai : राज्यात राजकीय घडमोडींना वेग येत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजप अधिक आक्रमक झाला आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. राज्य सरकारला विरोधक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे महत्वाची बैठक आज संध्याकाळी होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. (NCP meeting in the presence of Sharad Pawar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींवर शरद पवार चर्चा करणार आहेत.



राष्ट्रवादीचे बैठक संध्याकाळी 5.30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत.