मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी शपथविधीत  आपल्या आईचंही नाव घेत शपथ घेतली. मी जयंत कुसुम राजाराम पाटील, अशा वाक्याने त्यांनी आपल्या शपथविधीची सुरूवात केली. जयंत पाटील यांच्याकडे राज्याचं अर्थमंत्रीपदाची धुरा येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शपथविधीनंतर जयंत पाटील यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे, महाराष्ट्राचा मंत्री म्हणून दिलेली जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो. यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप जास्त आनंद झाला असता. आई जिथे कुठे असेल तिथून मला पाहून नक्कीच आशीर्वाद देत असेल.