मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचा संकट असले तरी राजकारणाची चर्चा जोरात आहे. भाजपला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चिमटा काढला आहे. भाजपकडून सांगण्यात येत आहे की, आजही शिवसेनेसोबत जाण्यात तयार आहोत. म्हणजे यांना सत्तेत येण्याची घाई दिसत आहे. ते महाआघाडीत घ्या असे म्हणत शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं, असा टोला आमदार रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्टिट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचे बीजीपीतील एक मोठे नेते म्हणाले.सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता पाच वर्षात भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असे म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा, असा सल्लाही देण्यास रोहित पवार विसरले नाहीत.



भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आगामी निवडणुकी स्वबळावर लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भूमिकेला छेद दिला. राज्यातील राजकारणावर त्यांनी भाष्य केले.  शिवसेनेसोबत जायला तयार आहोत, असे पाटील विधान केले. या विधानाचा धागा पकडत आमदार रोहित पवार यांनीही पाटील यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली आहे. भाजपला सत्तेत जाण्याची घाई लागली आहे.  


चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाचं संकट पाहता आम्ही आजही राज्याच्या हितासाठी शिवसेनेत जाण्यास तयार आहोत, असे म्हटले होते. त्याचबरोबर शिवसेनेसोबत गेलो तरी त्यांच्यासोबत निवडणुका एकत्र न लढता स्वतंत्र लढवणार, असा निर्वाळाही त्यांनी दिला होता. त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सासवासारव करण्याचा प्रयत्न केला. आम्ही युतीबाबत शिवसेनेला प्रस्ताव काही दिलेला नाही. दरम्यान, सामना दैनिकातून चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यात आता रोहित पवार यांनी टीका केल्याने भाजपकडून काय उत्तर येणार याचीही उत्सुकता आहे.


 शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तूनही पाटील यांच्या या विधानाचा जोरदार समाचार घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर नड्डा यांना आडवे जाणारे एक बालिश वक्तव्य केले. ‘राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत.’ आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्री पद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही, असा टोला लगावला आहे.