NCP National Committee : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) राष्ट्रीय कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) तर उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) आणि मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांची निवड जाहीर झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याने पक्षातील मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून जनरल सेक्रेटरी पदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि नरेंद्र वर्मा (Narendra Varma) यांची वर्णी लागली आहे. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) आणि खासदार सुप्रिया सुळे (Suprya Sule) यांची निवड झाली आहे. 


खासदार सुनिल तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक, किसान सेलची जबाबदारी तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मिडिया आणि आयटी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी तसंच सहकार या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे नेते नवाब मलिक यांना मात्र या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही.



अशी आहे राष्ट्रवादीची कार्यकारिणी -


राष्ट्रीय अध्यक्ष - शरद पवार


राष्ट्रीय उपाध्यक्ष - प्रफुल्ल पटेल


राष्ट्रीय सरचिटणीस - सुनील तटकरे


राष्ट्रीय सरचिटणीस - योगानंद शास्त्री


राष्ट्रीय सरचिटणीस - के के शर्मा


राष्ट्रीय सरचिटणीस - पीपी मोहम्मद फैजल


राष्ट्रीय सरचिटणीस - नरेंद्र वर्मा


राष्ट्रीय सरचिटणीस - जितेंद्र आव्हाड


राष्ट्रीय खजिनदार - वाय पी त्रिवेदी


कायम सचिव - एस आर कोहली