मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आपण पाहुण्यांचे स्वागत करण्यास तयार असल्याचे ट्विट केलं आहे. मात्र, हे पाहुणे कोण याचा त्यांनी उल्लेख केला नाही. यामुळे मलिक यांच्या घरी येणारे ते पाहुणे कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाब मलिक हे आघाडी सरकारमधील महत्वाचे मंत्री आहेत. समीर वानखेडे प्रकरणावरुन त्यांनी भाजप नेत्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले होते. तर, दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मलिक यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले होते.


मात्र, याचवेळी नवाब मलिक यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. खुद्द, नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी घरी ‘पाहुणे’ येणार असतील तर त्यांनी मला सांगावं, मीच ईडीमध्ये येईल असे भाकीत ट्विट करून वर्तवलं होतं.
 
त्यांनतर आज मलिक यांनी पुन्हा ट्विट केलं आहे. यात त्यांनी उद्या सकाळी काही अधिकृत पाहुणे माझ्या निवासस्थानी येणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. मी त्यांचे चहा आणि कुकीजने मनापासून स्वागत करण्यास तयार आहे. त्यांना योग्य पत्ता हवा असल्यास ते मला कॉल करू शकतात, अस म्हटलं आहे.


मलिक यांच्या या ट्विटमुळे उद्या त्यांच्या घरे येणारे पाहुणे नेमके कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.