मुंबई : कोरोनाचं संकट लक्षात घेऊन आपण हे सगळं करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. महत्वाचं म्हणजे देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्वाचं म्हणजे या लाईव्हमध्ये शरद पवारांनी खूप मोठा विश्वास दिला. ते म्हणजे आपण कोरोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा असंही आवाहन त्यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे यावेळी शरद पवारांना दिलेल्या माहितीनुसार, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडवू नका. संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी सर्व शक्ती वापरा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. द्राक्षं आणि आंबा उत्पादकांना सरकारने मदत करावी असंही आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. 



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे संचारबंदी देखील असल्यामुळे बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. अशावेळी शरद पवारांनी जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला आहे.