मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसाचे चिंतन शिबिर उदया ६ नोव्हेंबरपासून कर्जत येथे सुरु होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक,राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या  प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, कर्जतचे आमदार  सुरेश लाड आदी  मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


६ आणि ७ नोव्हेंबरला होणार्‍या या चिंतन शिबिरात सकाळी १०.१० वाजता झेंडावंदन होणार आहे. त्यानंतर पहिल्या दिवशी च्या पहिल्या सत्रात शेतक-यांचा प्रश्न,नोटबंदी,जीएसटी या  प्रश्नावर चर्चा केली जाणार आहे. आणि दुसऱ्या सत्रात नागरीकरण, युवक, महिलांचे सबलीकरण आदी  विषयांवर चर्चा होणार आहे.


७ नोव्हेंबरला सकाळच्या सत्रात संघटना  वाढ, राजकीय ठराव, पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाणार  आहे. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांचे  समारोप भाषण  होणार आहे.