मुंबई : पीएनबी आणि नीरव मोदीच्या ११५०० कोटी रुपयांचा अपहाराचं केद्र असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतल्या ब्रॅडी हाऊसमधल्या शाखेला सीबीआयनं टाळं ठोकलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अटकेत असणाऱ्या गोकूळनाथ शेट्टी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी याच शाखेत बसून नीरव मोदीवर पैशांचा पाऊस पाडल्याचं समोर आलं आहे. सध्या गोकूळनाथ शेट्टी आणि त्याचे सहकारी पोलीस कोठीडत आहेत. 


दरम्यान, नीरव मोदी पाठोपाठ रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी देखील सरकारी बँकांचा आठशे कोटी रुपये थकवून देशाबाहेर पसार झाला आहे. कानपूरची कंपनी रोटोमॅक इंडियाच्या नावे कोठारीनी अनेक सरकारी बँकांनी अहलाहबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँकेकडून एकूण 800 कोटी रुपयांची कर्ज घेतली आहेत.  कोठारींवर विलफुल डिफॉल्टर म्हणून घोषित केलं होतं.