काँग्रेस नेत्यांचा सोनियांसमोर एक नवा प्रस्ताव?
काँग्रेसनं राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यासाठी नवी अट घातली असल्याची चर्चा आहे.
मुंबई : काँग्रेसनं राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यासाठी नवी अट घातली असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असल्यास काँग्रेस राष्ट्रवादी-शिवसेना सरकारला पाठिंबा देणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर यासंदर्भात मत व्यक्त केल्याची माहिती 'झी २४ तास'ला सुत्रांनी दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसला आज रात्री साडेआठपर्यंत संख्याबळ सादर करायचं आहे.
मात्र यावर अजित पवार यांनी ही सुत्रांची माहिती सरळ फेटाळून लावली आहे. अशी कोणतीही चर्चा काँग्रेस आणि आमच्यात नाही. खरंतर कमी वेळेत हे सर्व व्हायला पाहिजे.
राष्ट्रवादीच्या बाजूने बहुमत नाही, हे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. भाजपा आणि शिवसेना सत्तास्थापनेसाठी एकत्र आले नाहीत. यानंतर शिवसेनेला संधी देण्यात आली, त्यानंतर ती राष्ट्रवादीकडे आली आहे, पण खूप अडचणीची स्थिती असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे.