मुंबईत रात्रभर पार्टीचा माहोल, जमावबंदी आणि कोरोना नियमांचा फज्जा
New Year celebrations : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू केली असतानाही जुहू आणि खारमध्ये जमावबंदी आणि कोरोनाच्या (Coronavirus) नियमांचा फज्जा उडाल्याचे समोर आले.
मुंबई : New Year celebrations : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू केली असतानाही जुहू आणि खारमध्ये जमावबंदी आणि कोरोनाच्या (Coronavirus) नियमांचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. जुहू आणि खारमधील पबमध्ये रात्रभर थर्टिफस्टपार्ट्या रंगल्या होत्या. या पार्ट्यांमध्ये ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात होतं ना मास्कचा वापर. 'झी 24तास'ने या पार्ट्यांचा पर्दाफाश केला आहे. (Night party in Mumbai, No Followed Covid rules in party )
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार, बीएमसी आणि मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसांत एकामागून एक अनेक नवीन आणि कठोर नियम केले आहेत. बीएमसी आणि मुंबई पोलिसांच्या या दोन्ही परिपत्रकांनुसार, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान शहरात कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन, पार्ट्या, मेळावे, नाचगाणे, गाणे यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. मात्र या सरकारी कागदपत्रांवर लिहिलेल्या निर्णयांचे वास्तव चित्र काय आहे, हे जाणून घेण्यासाठी 'झी 24तास'च्या टीमने विशेष तपासणी केली.
'झी मीडिया'चे प्रतिनिधी अमित रामसे आणि नीलेश शुक्ला हे वास्तव तपासण्यासाठी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या आधी मुंबईतील अनेक ठिकाणी पोहोचले. आमच्या तपासात जे सत्य समोर आले ते अतिशय धक्कादायक आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू केली असतानाही जुहू आणि खारमध्ये जमावबंदी आणि कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाल्याचं समोर आले.
मुंबईत रात्री दीड वाजेपर्यंत पार्टी बेधडकपणे सुरू होती. कर्णकर्कश संगीताच्या गाण्यावर पार्टीत सहभागी झालेले लोकही कोरोनाबाबत बेफिकीर दिसले. कोणीही मास्क घातलेला नव्हता किंवा सोशल डिस्टन्सिंगही नव्हते. दुसरीकडे, जुहू भागात ही परिस्थिती दिसून आली. मुंबईतील सर्वात पॉश भागांपैकी एक हा परिसर पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. सध्याच्या निर्बंधांमुळे इथले काही डिस्को आणि पब सुरुच होते. तेथे जोरदार पार्ट्या सुरु होत्या. राज्य सरकारचे आणि पोलिसांचे सर्व आदेश धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून येत होते.