मुंबई: मनसुख हिरेन आणि स्फोटकं प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या घरावर छापेमारी सुरू होती. या छापेमारीनंतर एनआयएने चौकशीसाठी त्यांना नेलं होतं. आता मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसुख हिरेन प्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर करण्यात आला आहे. एनआयएच्या स्पेशल कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली होती. आता प्रदीप शर्मा यांना देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 



प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. अँटीलियाबाहेरील स्फोटकं आणि हिरेन प्रकरणात कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 


 


याआधी या प्रकरणात एकूण 7 जणांना अटक झालीय. यात वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, सुनील माने, रियाज काझी यांना अटक झाली आहे. तर दोन दिवसापूर्वी प्रदीप शर्मा यांच्या जवळचे समजले जाणारे संतोष शेलार आणि आनंद जाधव यांनाही अटक करण्यात आली आहे.