मुंबई : Nitesh Rane Case : भाजप आमदार नितेश राणे यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. आयाआधीही त्यांना अटक करण्याबाबत दिलासा मिळाला होता. न्यायालयाची सुनावणी सुरु असल्याने त्यांनी अटक करणार नाही, असे माहिती राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राडा पाहायला मिळाला. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab attack case ) सिंधुदुर्ग पोलीस भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत.  नितेश राणे हे अद्याप अज्ञातस्थळी आहेत. पोलिसांना अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, त्यांची अटक टळली आहे. (Big update on the arrest of BJP MLA Nitesh Rane)


न्यायालय सुनावणी पुढे ढकल्याने आता पुढील बुधवारपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढील बुधवारपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. नितेश राणे यांच्यावतीने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे.



नितेश राणे यांचे वकील अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी माहिती दिली. गेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास वेळ मागितला होता. यामुळे नितेश राणे यांच्यावर कारवाई न करण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती ज्याला  मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती.


भाजप आमदार नितेश राणे अटकेच्या भीतीने अज्ञातस्थळी आहेत. त्यांची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई होणार नाही. 


दरम्यान, नॉट रिचेबल आमदार नितेश राणे फेसबूकवर अ‍ॅक्टीव्ह दिसून आलेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणानंतर नितेश राणे नॉटरिचेबल आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलीस शोधत आहेत.