मुंबई : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्यानंतर त्यांना तातडीने इंदूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, भय्यू महाराजांनी इतके मोठे टोकाचे पाऊल का उचलले याची अद्याप माहिती मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दुसरे लग्न केले होते. या विवाहानंतर घरातील वातावरण तणावाचे होते अशीही चर्चा आहे. भय्यू महाराजांच्या  निधानानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शोक व्यक्त केलाय. ट्विटरवरुन त्यांनी भय्यू महाराजांना श्रद्धांजली वाहिली.  


आध्यात्मिक गुरु श्री भय्यूजी महाराज यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यांच्याशी माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा हा अकाली मृत्यु मनाला चटका लावणारा आहे. माझी विनम्र श्रद्धांजलि...असं गडकरींनी ट्विट केलंय.