मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या १० रुपयांत थाळीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज नसल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. ही माहिती आली कुठून हे माहित नसल्याचं मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते म्हणाले. थाळीच लाभ हा गरिबांसाठी असून सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याचा फायदा उठवू नये, असा सल्लाही छगन भुजबळांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोगस लाभार्थी टाळण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्याचा सरकारचा विचार करत असल्याचं बोललं जात होतं. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी भुजबळांनी स्वतःच आधार कसं आवश्यक आहे, ते सांगितलं होतं. त्यावर भाजपनं टीका केल्यानंतर आता आधार सक्तीचं केलं जाणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. 


१० रूपयाच्या थाळीसाठी सरकारनं कोणत्याही अटी शर्ती लावू नयेत अशी मागणी भाजपनं केलीये.  26 जानेवारीपासून मुंबई आणि ठाण्यात 30-32 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर योजना सुरू होईल.