मुंबई : महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी नो पार्किंग झोनमध्ये आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईत सध्या पार्किंगवरून कारवाई सुरू आहे. महापालिका आयुक्तांनी जारी केलेल्या नो पार्किंग धोरणानुसार मुंबईकरांना भरमसाठ दंड आकारला जात आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आले आहे. मात्र खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी विलेपार्ले येथील एका हॉटेलबाहेर असलेल्या नो पार्किंग झोनमध्ये होती. त्यामुळे त्यांनी नियम मोडला होता. यावरुन जोरदार टीका झाली. अखेल महापौरांना आता दंड आकारण्यात आला असून त्यांना ई-चलन पाठविण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरपालिकेने रस्त्यावर वाहनांच्या अनधिकृत पार्किंगविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. आठ दिवसांत २५ लाखांची बेकायदा पार्किंगमधून वसूली करण्यात आली आहे. आतापर्यंत ५०५ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. यात आता मुंबई महापौरांची भर पडली आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये दंडाच्या रक्कमेतून पालिकेने कोट्यवधी रुपयेही वसूल केला आहे. हा पार्किंगचा नियम वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी करण्यात आला आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या नियमांना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीच हरताळ फासल्याने जोरटार टीका झाली.


महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी विलेपार्ले येथे नो पार्किंग क्षेत्रात उभी करण्यात आल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि शिवसेना चांगलीच अडचणीत आली. मात्र, महापौरांच्या गाडीवर पालिकेने कोणतीही कारवाई केली नव्हती. टीका होऊ लागल्याने अखेर महापौर यांनी मौन सोडत मी जर नियम मोडला असेल तर मला नोटीस पाठविण्यात यावी, मी दंड भरेन असे म्हटले होते. त्यानुसार आता त्यांना ई चलन पाठविण्यात आले आहे. 


मुंबई पालिकेकडून काही दिवसांपूर्वी शहरात नवे पार्किंग धोरण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार, वाहनतळाच्या ५०० मीटर क्षेत्रात वाहन अनधिकृरित्या पार्किंग केल्यास ५ हजार ते १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. या नियमानुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना १० हजारांचा दंड देणे होवू शकतो, अशी माहिती मिळत आहे.