मुंबई : राज्यात डोमेसाईल सर्टिफिकेटवरून कुठलाही घोटाळा नसल्याचा दावा वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिणनगारे यांनी केला आहे. राज्याबाहेरच्या साडे सातशे विद्यार्थ्यांना डोमेसाईलच्या कारणावरून अपात्र ठरवण्यात आल्याची माहितीही त्यांनी झी 24 तासला दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैद्यकीय संचालनालायकडे एकही बोगस डोमेसाईल नसल्याचंही शिनगारेंना स्पष्टीकरण दिलं आहे. औरंगाबाद खंडीपाठीच्या निर्णयलाही आव्हान देणार असल्याचं वैद्यकीय संचालकांनी म्हटलं आहे. दरम्यान आजची यादी दोन दिवसानंतर जाहीर करणार असल्याचंही  डॉ. प्रविण शिनगारेंनी स्पष्ट केलं आहे.


वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी खोटी डोमेसाईल सर्फिटीकेट सादर करण्यात आल्याचा आरोप होतो आहे. हा घोटाळा मध्यप्रदेशात व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचा दावा झाला. आता प्रथमच याप्रकरणी वैद्यकीय संचालाकानी आपली बाजू झी 24 तासकडे मांडली आहे.