मुंबई : नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांच्याविरोधात विशेष पीएमएलए कोर्टाने शनिवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत.


ई-मेलवर प्रश्न विचारणे अशक्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीरव मोदीने आतापर्यंत दोन वेळा ई-मेलवर प्रश्न विचारा, असं म्हटलं आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तसं शक्य नसल्याचं ईडीने न्यायालयात स्पष्ट केलं .


तीन वेळा समन्स बजावूनही न्यायालयात गैरहजर


या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी करणारा अर्ज ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात सादर केला होता. नीरव मोदी आणि मेहूल चौक्सी यांना तीन वेळा समन्स बजावूनही ते न्यायालयात हजर राहिले नाहीत आणि चौकशीत कोणतंही सहकार्य केलं नाही, असं ईडीने कोर्टात म्हटलं आहे.


घोटाळ्यात पैशांच्या अपहार


लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्याच्या प्रक्रियेत नीरवने हस्तक्षेप केला आहे, असाही आरोप ईडीने ठेवला आहे. नीरव आणि मेहूलने केलेल्या घोटाळ्यात पैशांच्या अपहार झाला आहे. त्यामुळे या सगळ्या आर्थिक गैरव्यवहारांचा माग काढण्यासाठी नीरवची चौकशी करणं अतिशय आवश्यक असल्याचं ईडीने म्हटलं आहे.