नारायण राणे हाजीर हो! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा नोटीस
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 10 जूनला सुनावणीसाठी हजर रहाण्याचे आदेश
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. त्यांच्या जुहू इथल्या अधीश बंगल्याचं (adhish bungalow juhu) बांधकाम करताना सीआरझेड कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेपाठोपाठ आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयानं कारवाईचा बडगा उगारला आहे. या नोटीशीनुसार येत्या 10 जूनला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. सुनावणीला उपस्थित न राहिल्यास या विषयावर तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत असे समजून पुढील कारवाई करू, असं नोटिशीत म्हटलंय.
अधिक बंगल्याला 2007 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने सीआरझेड अंतर्गत एनओसी दिली होती. यातील 2 अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका नारायण राणे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एफएसआय कमी असातनाही 2.12 एफएसआय वापरला गेला, तसंच बंगल्यासाठी 2810 चौरस मीटरची बांधकाम परवानगी असताना 4272 चौरस मीटरचं बांधकाम केल्याचं या नोटिसीत म्हटलं आहे.