रेशन दुकानात मिळणारी साखर बंद
रेशन दुकानात मिळणारी साखर आता बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
मुंबई : रेशन दुकानात मिळणारी साखर आता बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
केंद्र सरकारनं अनुदान बंद केल्यानं राज्यातील दारिद्र्यरेषेखालील सुमारे 45 लाख कुटुंबांना रेशन दुकानांतून मिळणारी साखर बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
आता फक्त अंत्योदय योजनेतील गरिबातील गरीब कुटुंबांना साखर मिळणार आहे. मात्र त्याचाही दर पाच रुपयांनी वाढवण्यात आलाय.
शिवाय साखरेचा कोटा कमी केल्यामुळे या योजनेतील गरीब कुटुंबांनाही महिन्याला केवळ एकच किलो साखर दिली जाणार आहे. याचा फटका सुमारे 45 लाख बीपीएल कुटुंबांना बसणार आहे.