मुंबई  : मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे बेस्टच्यावतीने लेडीज स्पेशल बसेस सुरु करण्यात येणार आहेत. तेजस्विनी असं या बेस्ट बस सेवेचं नाव असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेस्ट उपक्रमात आतापर्यंत महिलांसाठी विशेष बस चालवल्या जात नव्हत्या. आता ही उणीव तेजस्विनी बसमधून पूर्ण केली जाणार आहे. बेस्टमधील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता तेजस्विनी सेवा उपयुक्त ठरणार आहे. 


१०० एसी आणि नॉन एसी अशा तेजस्विनी बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील. त्यात ड्रायव्हर-कंडक्टर म्हणून महिलांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ५० कोटी रुपयांचा निधी बेस्टला मिळाला आहे. 


तेजस्विनी सेवा प्रामुख्याने ऐन गर्दीच्या वेळी केवळ महिलांसाठी चालवल्या जाणार आहेत. इतर वेळी त्यात पुरुष प्रवाशांनाही प्रवासाची मुभा असेल.