मुंबई :  आता शिक्षकांची भरती मेरीट लिस्टप्रमाणे होणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. या प्रक्रियेमुळे भ्रष्टाचार संपुष्टात येईल. आणि गुणवत्ताधारक शिक्षक मिळतीलं असंही त्यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता केंद्रीय पद्धतीनं परीक्षा घेतली जाईल. आणि अनुदार घेणा-या शाळेत वेब पोर्टवर जाहिरात द्यावी लागेल. तसंच परिक्षेची मेरिट लिस्ट ही पोर्टलवर असेल. 


देवाण-घेवाण झाल्याशिवाय बदली होत नाही आणि त्यामुळे यात बदल होण्याची मागणी शिक्षक संघटना, पदाधिकारी आणि आमदार मागणी करत होते. नागपूर खंडपीठात ही जनहित याचिका होती.