मुंबई : ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीतर्फे ३ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. तर १० नोव्हेंबरला मुंबईत ओबीसी नेत्यांच्या गोलमेज परिषदेचे नियोजन करण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणाबाबत पत्रकार परिषदेत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ही माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देता येईल, याचा अभ्यास खासदार संभाजीराजे यांनी करू नये ते नापास होतील, असा टोलाही नेते प्रकाश शेंडगे यांनी लगावला आहे.



गेल्या काही वर्षापासून मराठे आणि कुणबी एक आहेत, असा संभ्रम निर्माण केला जात असल्याचे मत व्यक्त करत कुणबींच्या सवलती मराठा समाजाला देऊ नये, असे चंद्रकांत बावकर यांनी व्यक्तव्य केले आहे.


हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाला घेराव आंदोलन करणार आहोत, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. तसेच ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समिती तर्फे ३ नोव्हेंबर ला राज्यभर आंदोलन केल जाणार आहे. १० नोव्हेंबरला मुंबईत ओबीसी नेत्यांच्या गोलमेज परिषदेचे नियोजन करण्यात येणार आहे. मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, 'सारथी' संस्थेला स्वायत्तता दिली त्या प्रमाणेच 'महाज्योती' या संस्थेला स्वायत्तता द्यावी. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देता येईल ही हरीभाऊ राठोड यांची व्यक्तिगत भूमिका आहे. ती ओबीसी समाजाची भूमिका नाही. आम्ही त्यांचा निषेध करतो, असे ते म्हणालेत.


गेल्या काही वर्षांपासून मराठे आणि कुणबी एक आहेत असा संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यासाठी काही दाखले दिले जात आहेत हे वस्तू स्थितीला धरून नाही, असे ओबीसी नेते चंद्रकांत बावकर यांनी म्हटले आहे.