ओबीसी आरक्षणाचा ठराव हा सरकारचा वेळकाढूपणा - फडणवीस
ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation ) ठराव हा सरकारचा वेळकाढूपणा आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी केली.
मुंबई : ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation ) ठराव हा सरकारचा वेळकाढूपणा आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी केली. तरीही समाजासाठी आम्ही सरकारच्या या ठरावाला समर्थन देणार आहोत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र या ठरावामुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नाही असं फडणवीसांनी म्हटले आहे. 'सरकारने 15 महिने काय केले, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, राज्यातील लाखो मुले परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. पण सरकारला याबद्दल गांभीर्य नाही. स्वप्निलने जे टोकाचे पाऊल उचलले आहे. आता तरी त्यावर तातडीने विचार व्हायला हवा. अशा घटना होईपर्यंत सरकार आणि आयोग काय करत आहे, असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. ओबीसी, मराठा आरक्षणबाबतच्या सरकारच्या या ठरावाला भाजप समर्थन देईल, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचवेळी ओबीसींच्या आरक्षणाचा ठराव म्हणजे दिखावा, असे ते म्हणाले.
OBC आणि मराठा आरक्षणाचे मुद्दे हे राज्य सरकारचेच विषय असल्याचे फडणवीस यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे. राज्याच्या निर्मितीला 60 वर्ष पूर्ण झाली. पण जे आतापर्यंत घडले नाही ते आता घडताना दिसत आहे. राज्य सरकारने विधानमंडळात सदस्यांनी बोलू नये अशी व्यवस्था केली जात आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.