मुंबई : पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी नोटीस  बजावली आहे. तर राज्यात अशा २७ जणांना नोटीसा आल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आरोप केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर लिहिणाऱ्या जवळपास २७ जणांना सरकारच्या सायबर सेलने नोटीसा पाठवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल कांजूरमार्ग पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यालाही नोटीस पाठवली आहे. 



महेंद्र रावले यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. पोस्टच्या माध्यमातून सामाजिक शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असा विक्रोळी पोलिसांचा दावा आहे. अशा २७ जणांना नोटीसी पाठवण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. 


अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. तर याबाबत आपण तातडीने मुख्यमंत्र्यांना भेटू आणि यामागे कोण आहे याची माहिती घेऊ असं मुंडे म्हणाले.