मुंबई : एसटी महामंडळ अर्थात महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळाचे (Maharashtra State Road Transport Corporatio) समाजमाध्यमांवर बनावट खाते उघडण्यात आले होते. याबाबत सावध करण्यात आले होते. आता एसटीने आपले अधिकृत ट्विटर अकाउंट प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाकडून अधिकृत प्रसिद्ध माहिती मिळण्यास या माध्यमातून मदत होणार आहे.


ST महामंडळाच्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 MSRTCचे बनावट  ट्विटर, इंस्टाग्राम अकाउंट सरुु करुन माहिती देण्यात येत होती. मात्र ही माहिती अधिकृत नाही. त्यामुळे ही दोन्हा अकाउंट बंद करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचे अधिकृत ट्विटर अकाउंट असल्याचे सांगून एसटी महामंडळाचा या बनावट अकाउंटवर लोगोही वापरण्यात आला आहे. तसेच इंस्टाग्रामवर ऑफिशिअल अकाउंट म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच गाव तिथे रस्ता... रस्ता तिथे एसटी असाही उल्लेख कऱण्यात आला आहे. ट्विटर आणि इंस्टाग्रामवरील ही दोन्ही अकाउंट बनावट असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच लवकरच एस. टी. महामंडळाची अकाउंट प्रसिद्ध केली जातील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आता ट्टिटरवर एसटीचे अधिकृत अकाउंट सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.



MSRTCचे बनावट  ट्विटर, इंस्टाग्रामवर दोन्ही बवावट अकाउंटबाबत राज्यमंत्री सतेज पाटील तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या अकाउंटवरील माहिती अधिकृत नाही. महामंडळाकडून येत्या काही दिवसांत अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल्स प्रसिद्ध केले जातील, असेही सतेज पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.  त्यानुसार आता MSRTCचे  अधिकृत अकाउंट प्रसिद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यमंत्री सतेज तथा बंटी पाटील यांनी ट्विट करुन दिली आहे.


दरम्यान, एस. टी. महामंडळाचा लोगोचा आणि सोशल मीडियाच्या नावाखाली गैरवापर होत असल्याने सतेज पाटील यांनी याबाबत ट्विट केले होते.  त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे की,  एसटी महामंडळाचे खालील स्क्रीनशॉटमध्ये दाखवलेले ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट हे अधिकृत नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच त्यावरील कोणत्याही अपडेटवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले होते.