मुंबई विमानतळावर ११ आयफोन एक्स जप्त
आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर आयकर विभागानं ११ आयफोन एक्स जप्त करण्याता आले आहेत. भावेश विराणी याच्याकडून हे आयफोन्स जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई : आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर आयकर विभागानं ११ आयफोन एक्स जप्त करण्याता आले आहेत. भावेश विराणी याच्याकडून हे आयफोन्स जप्त करण्यात आले आहेत.
विराणी हे आयफोन हाँगकाँगहून भारतात आणत होता. या मोबाईल्सची एकूण किंमत १० लाख ५७ हजार ३८८ रुपये आहे. सुरक्षा यंत्रणेला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे हे आयफोन आढळून आले.
आयफोन एक्स हा मोबाईल नुकताच बाजारात आला आहे. याप्रकरणी विराणी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय.
दरम्यान, ठाण्यात एका युवकाने आयफोन एक्स खरेदी केल्यानंतर घोड्यावरून शहरात फिरुन मिरवणूक काढली होती.