खाद्यतेल बोगस ! अशा तेलामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका?
आता एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी. तुम्ही जेवण बनवण्यासाठी जे खाद्यतेल (Edible oil) वापरता, ते बोगस असल्याचं एफडीएच्या तपासणीत आढळून आले. तुमच्या तेलात भेसळ (oil)आहे, हे कसं ओळखावं, त्यासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट.
प्रशांत अंकुशराव / मुंबई : आता एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी. तुम्ही जेवण बनवण्यासाठी जे खाद्यतेल (Edible oil) वापरता, ते बोगस असल्याचं एफडीएच्या तपासणीत आढळून आले. तुमच्या तेलात भेसळ (oil)आहे, हे कसं ओळखावं, त्यासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट.
बोगस तेलामुळे हार्ट अटॅक (heart attack) येण्याचा धोका आता आणखी वाढणार आहे. कारण अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुट्या खाद्यतेलापैकी सुमारे 50 टक्के तेल भेसळयुक्त आहे, असं अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत आढळले आहे. एफडीएनं ३० पथकं तयार करून सुट्या तेलाचे नमुने गोळा केले आणि ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. तेव्हा खाद्यतेलात केमिकल तसंच रंग मिसळण्यात आल्याचं आढळले. सुटं खाद्यतेल स्वस्त असतं. झोपडपट्टी तसंच ग्रामीण भागात या सुट्या तेलाला प्रचंड मागणी असते. त्यामुळंच तिथंच मोठ्या प्रमाणात बोगस तेलाची विक्री होत असल्याचं आढळलंय.. एफडीएच्या धाडीत तब्बल 5 कोटी रुपयांचा भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त करण्यात आलाय...
तेल बोगस आहे हे कसं ओळखावं, या काही टिप्स
त्यानुसार तेलाचे थेंब हातावर घेऊन ते घासावेत
तेल गरम झालं की त्याचा वास घ्यावा
केमिकलयुक्त तेलात केमिकलचा वास येतो
तेल फ्रीजमध्ये ठेवल्यास पामतेल खाली घट्ट होतं
गोडेतेल फ्रिजरमध्ये गोठवावं
गोठवलेलं तेल बाहेर काढल्यास 3 मिनिटात पूर्ववत होतं
तेल बोगस असल्याची थोडी जरी शंका आली तरी एफडीएशी संपर्क साधून तुम्ही तेलाची तपासणी करू शकता. सध्या सुट्या तेलात भेसळ होत असल्याचं आढळले आहे. लवकरच ब्रँडेड कंपन्यांच्या खाद्यतेलाची देखील तपासणी केली जाणार आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यभरात ही मोहीम राबवली जाणार आहे.